दादा भुसेंच्या जावयाच्या अडचणीत आणखी वाढ, आता ३ सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडी
योगेश पांडे / वार्ताहर
वसई – वसई विरारमध्ये डंपिग ग्राऊंडसाठी राखीव असलेल्या जागेवर ४१ अनधिकृत बांधकाम उभारल्याप्रकरणी अटकेत असलेल्या माजी आयुक्त अनिल कुमार यांना पीएमएलए कोर्टाने आता पुन्हा १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अनिल कुमार पवार यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पवार यांच्यासह इतर तिघांना देखील तितक्याच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. वसई विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह नगर रचना विभागाचे उपसंचालक निलंबित वाय एस रेड्डी, तसेच बांधकाम व्यावसायिक सिताराम गुप्ता आणि अरूण गुप्ता या चौघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे या चौघांना आता ३ सप्टेंबर पर्यंत कोठडीत रहावे लागणार आहे. याआधी कोर्टात या चौघांना सहा दिवसांच्या कोठडी सुनावण्यात आली होती.त्यानंतर आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर ४१ अनधिकृत इमारती प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत त्यांना बुधवारी रात्री ईडीने अटक केली होती. पवार यांच्यासह ईडीने नगररचनाकार वाय एस रेड्डी,सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता यांनाही अटक केली होती. अनिल कुमार पवार यांच्यावर वसई विरार परिसरात मलनिस्सारण आणि डंपिंग ग्राउंडसाठी राखीव ६० एकर भूखंडावर बांधण्यात आल्या होत्या ४१ अनधिकृत इमारतीत मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीताराम गुप्ता यांच्यावर सूत्रधार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आणि अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने करोडोंचा भ्रष्टाचार केल्याची माहिती आहे.
या प्रकरणातील यापूर्वीच्या छाप्यात ८ कोटी ९४ लाख रोख,२३ कोटी २५ लाखाचे हिरे,१३ कोटी ८६ लाखाचे शेअर्स अणि गुंतवणूक, ईडी ने केल्या आहेत जप्ततर २९ जुलैला अनिल पवार यांच्या नाशिक येथील पुतण्या जनार्दन पवारचा घरी १ कोटी ३३ लाखाची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणात सनदी लेखापाल, वास्तुविशारद,कनिष्ठ अभियंते, ठेकेदार, बडे अधिकारी आणि अनेक एजंट आहेत ईडी च्या रडारवर आहेत.