भाजप करणार राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा; मविआ विरोधात मोठी पत्रकार परिषद घेणार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राजकीयदृष्ट्या एक महत्वाची बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या विरोधात सोमवारी भाजपची मोठी पत्रकार परिषद होणार आहे. भाजपकडून आज महाविकास आघाडीचा मोठा भांडाफोड करणार असल्याचा दावा पक्षातील सूत्रांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा करण्यात येणार आहे. मंत्री आशिष शेलार पत्रकार परिषद घेत भांडाफोड करणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या भाजपाची सर्वांत मोठी पत्रकार परिषद होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मंत्री आशिष शेलार पत्रकार परिषद घेत भांडाफोड करणार आहेत. मत चोरीच्या आरोपांबाबत भाजप गौप्यस्फोट करणार आहे. मविआच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजप नेते आशिष शेलारांची पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मविआच्या आरोपांचा भांडाफोड करण्यात येणार असल्याचा इशारा भाजपनं दिला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर शेलार नेमका काय गौप्यस्फोट याकडं सर्वाचं लक्ष्य लागलं आहे.
मतदारयादीतील घोळ आणि मतचोरी विरोधात शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्रित रस्त्यावर उतरले होते. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, किसान सभेचे नेते अजित नवले उपस्थित होते. त्याचबरोबर अनेक संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी देखील मतचोरीच्या विरोधात काल मोर्चा काढला होता. या मोर्चात बोलताना राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी मतचोरीच्या मुद्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.

