• Sun. Dec 14th, 2025

लोकलमध्ये वकिल महिलेचा विनयभंग; ४० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल



लोकलमध्ये वकिल महिलेचा विनयभंग; ४० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई – चर्चगेट रेल्वे पोलिसांनी एका ४० वर्षीय व्यक्तीविरुद्ध लोकल रेल्वेमध्ये वकिल महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने संबंधित महिलेचा परवानगीशिवाय व्हिडिओ चित्रीत केल्याचा देखील आरोप आहे.

आरोपीचे नाव हेमांशू गांधी (वय ४०, रा. मालाड पूर्व) असे असून तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. पीडित महिला ३० वर्षीय असून ती मुंबई उच्च न्यायालयात वकिली करते.

रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास चर्चगेट-बोरीवली फास्ट लोकलच्या जनरल डब्यात ही घटना घडली. पीडित महिला बांद्रा (पश्चिम) येथील रहिवासी असून, ती कामावरून घरी परतत असताना आरोपीने तिचा मोबाईल फोनवर व्हिडिओ चित्रीत केला. महिलेनं विरोध केल्यानंतर बोरीवली स्थानकावर उतरून रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

बोरीवली पोलिसांनी याप्रकरणी झिरो एफआयआर दाखल करून प्रकरण चर्चगेट रेल्वे पोलिसांकडे वर्ग केले. चर्चगेट जीआरपीने १० नोव्हेंबर रोजी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७७ (गुप्त चित्रीकरण/व्हॉयरिझम), ७८ (पाठलाग करणे/स्टॉकिंग) आणि ७९ (महिलेला अपमानित करण्याच्या हेतूने केलेली कृती, शब्द किंवा हावभाव) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चर्चगेट रेल्वे पोलिसांनी आरोपी हेमांशू गांधी याला चौकशीसाठी नोटीस बजावली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें