• Fri. Feb 6th, 2026

भाजप खासदाराच्या मुंबईतील घरात चोरी; डुप्लिकेट चाव्यांनी तिजोरी उघडून रोकड लंपास केल्या प्रकरणी माजी कर्मचाऱ्याला अटक



भाजप खासदाराच्या मुंबईतील घरात चोरी; डुप्लिकेट चाव्यांनी तिजोरी उघडून रोकड लंपास केल्या प्रकरणी माजी कर्मचाऱ्याला अटक

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – दिल्लीतील भाजपचे खासदार आणि सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेते, गायक मनोज तिवारी यांच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या मुंबईतील घरी ही चोरी झाली. डुप्लिकेट चाव्यांनी तिजोरी उघडून त्यामध्ये असलेली लाखो रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. अंधेरी पश्चिम येथील शास्त्री नगर परिसरातील सुंदरबन अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी तिवारी यांच्या एका माजी कर्मचाऱ्याला अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

मनोज तिवारी यांचे मॅनेजर प्रमोद जोगिंदर पांडे यांनी या प्रकरणी अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ते गेल्या २० वर्षांपासून तिवारी यांचे मॅनेजर आहेत. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, बेडरूममधून एकूण ५.४० लाख रुपयांची रोकड चोरीला गेली. या रकमेपैकी ४.४० लाख रुपये जून २०२५ मध्ये कपाटातून गायब झाले होते, पण त्यावेळी चोराची ओळख पटली नव्हती. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. १५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास सीसीटीव्ही अलर्टमध्ये माजी कर्मचारी चोरी करत असल्याचे उघड झाले.

डिसेंबर २०२५ मध्ये घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते.१५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सीसीटीव्ही अलर्टमध्ये माजी कर्मचारी सुरेंद्रकुमार शर्मा चोरी करत असल्याचे उघड झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीकडे घराच्या, बेडरूमच्या आणि वॉर्डरोबच्या डुप्लिकेट चाव्या असल्याचे दिसून आले, ज्यामुळे तो सहज प्रवेश करू शकला.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने त्या रात्री अंदाजे १ लाख रुपये चोरले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, आरोपीची चौकशी करण्यात आली आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

तिवारी यांच्या मुंबईतील घरी हा आरोपी अनेक वर्षांपासून काम करत होता. सुरेंद्रकुमार शर्मा असं आरोपीचं नाव आहे. दोन वर्षांपूर्वीच त्याला कामावरुन काढून टाकण्यात आले होते. दरम्यान, अंबोली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसेच पोलिसांनी घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे आणि संबंधित कलमांखाली आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें