• Thu. Apr 2nd, 2026

महापौर यांच्या अधिकृत गाडीला लावलेल्या लाल आणि निळ्या दिव्यावरुन वाद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्लीनचिट



महापौर यांच्या अधिकृत गाडीला लावलेल्या लाल आणि निळ्या दिव्यावरुन वाद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्लीनचिट

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांच्या नव्या अधिकृत गाडीवर लावलेल्या लाल आणि निळ्या दिव्यांमुळे सध्या सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने २०१७ मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा, नामफलक, ध्वज किंवा अधिकार दर्शवणारी चिन्हे लावण्यास बंदी घातली होती. त्यानंतर आता रितू तावडे यांच्या गाडीला लावलेले लाल-निळे दिवे पाहून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, या प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी त्याची माहिती घेतली. लाल दिवा गाडीवर वैगरे नव्हता. पण बोनेटच्या ठिकाणी लाल दिवा होता. त्याच्यामध्ये महापौरांचा काहीच दोष नाहीये. त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरु नयेत हा जुनाच आपला नियम आहे. त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे. मला असे वाटतय की त्यांना विनाकारण टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे टार्गेट करणे योग्य नाही.”

नव्या महापौर रितू तावडे यांच्या नव्या इनोव्हा गाडीवर छतावर दिवे नसले तरी समोरच्या भागात लाल आणि निळे फ्लॅशिंग दिवे बसवलेले दिसत आहेत. तसेच त्यांच्या ताफ्यातील एक स्कॉर्पिओ गाडीवरही पोलिस वाहनांसारखे लाल-निळे दिवे लावलेले आहेत. यामुळे व्हीआयपी संस्कृती पुन्हा सुरू झाल्याची चर्चा सुरु आहे. त्यांच्या गाडीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मिसुद्धा महापौर राहिलेली आहे मला जे नियम सांगण्यात आलेले होते त्यानुसार मी त्याचे प्रोटोकॉल पाळले होते.मी महापौर असताना फॅमिलीसाठी असणारी गाडी नाकारली होती. प्रोटोकॉल विचारून महापौरानी माहिती घेतली नाही का ? कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही दिव्याची गाडी वापरली ? मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेल्या बदल्यांचे आदेश काढण्याचे अधिकार तुम्हाला आहेत का ? तुम्ही म्हणताय आधीच्या महापौर कधीच दिसल्या नाहीत ? तुम्हाला काम करणाऱ्या महापौर कशा दिसतील असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें