• Fri. Jun 5th, 2026

खासदार निलेश लंके यांची प्रकृती खालावली; अहिल्याानगरवरून तातडीने पुण्याला हलवलं



खासदार निलेश लंके यांची प्रकृती खालावली; अहिल्याानगरवरून तातडीने पुण्याला हलवलं

योगेश पांडे / वार्ताहर  

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डॅशिंग खासदार निलेश लंके यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारांसाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांच्यावर अहिल्यानगरमध्येच उपचार सुरू होते, मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी त्यांना पुण्याला हलवण्याचा सल्ला दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार लंके यांना गेल्या काही दिवसांपासून शारीरिक थकवा आणि अस्वस्थतेचा त्रास जाणवत होता. स्थानिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, प्रकृतीतील गुंतागुंत पाहता अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधांसाठी त्यांना पुण्यातील प्रसिद्ध ‘रुबी हॉल क्लिनिक’ येथे हलवण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या एका पथकाच्या देखरेखीखाली त्यांना पुण्यात नेण्यात आले आहे.

निलेश लंके यांच्या प्रकृतीची बातमी वाऱ्यासारखी पसरताच अहमदनगर आणि त्यांच्या मतदारसंघात समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लंके हे आपल्या कार्यकर्त्यांमध्ये सतत सक्रिय असतात, मात्र प्रकृतीमुळे त्यांना आता काही काळ विश्रांती घ्यावी लागणार आहे. अद्याप त्यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाकडून अधिकृत वैद्यकीय बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. मात्र, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची प्राथमिक माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळत आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें