• Sat. Jun 13th, 2026

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात हालचाली; रवींद्र फाटकांची भाजप आमदार केळकर यांची भेट



विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात हालचाली; रवींद्र फाटकांची भाजप आमदार केळकर यांची भेट

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी भाजप आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपच्या काही स्थानिक नेत्यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली होती. त्यानंतर ही भेट महायुतीतील समन्वयाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

ठाणे विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून रवींद्र फाटक तर महाविकास आघाडीकडून अभिजीत पवार मैदानात आहेत. फाटक यांच्या उमेदवारी अर्जावेळी काही भाजप नेत्यांची अनुपस्थिती आणि त्यावरून विरोधकांनी केलेल्या सूचक टीकेमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते.

मात्र महायुतीत कोणताही बेबनाव नसल्याचे स्पष्ट करत फाटक यांनी ही भेट विकासकामे आणि भविष्यातील उपक्रमांबाबत चर्चा करण्यासाठी झाल्याचे सांगितले. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जात असला तरी स्थानिक पातळीवरील भाजप-शिवसेना संबंधांकडे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें