• Thu. Jul 23rd, 2026

कल्याण पूर्व भाजपला धक्का; दोन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर



कल्याण पूर्व भाजपला धक्का; दोन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपला दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे मोठा धक्का बसला आहे. जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर म्हात्रे आणि मंडल उपाध्यक्ष विमल कटके यांनी शेकडो समर्थकांसह पक्षपदांचा राजीनामा दिल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

राजीनामा देताना दोन्ही नेत्यांनी पक्षातील जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून नव्याने पक्षात आलेल्यांना महत्त्वाची पदे व संधी दिली जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या घडामोडींमुळे कल्याण पूर्व भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली असून, स्थानिक नेतृत्वासमोर नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. आगामी स्थानिक राजकीय समीकरणांवर या राजीनाम्यांचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें