अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रकृती बिघडली, मुंबईत उपचार सुरू
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नरहरी झिरवळ हे किडनीच्या आजाराने त्रस्त झाल्यामुळे मागील ८ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईतील सैफी रुग्णालयात झिरवाळ यांच्यावर उपचार सुरू आहे. सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती झिरवाळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.