• Sun. Oct 19th, 2025

ज्यांना गोष्टी कळत नाहीत त्यांनी मला हिंदुत्व शिकवू नयेत – राज ठाकरे



ज्यांना गोष्टी कळत नाहीत त्यांनी मला हिंदुत्व शिकवू नयेत – राज ठाकरे

राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – कुंभमेळ्याचं पाणी प्यायलो नाही असं म्हटल्यावर नवीन वारं गेलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं की मी कुंभमेळ्याचा अपमान करतोय. पण प्रश्न हा कुंभमेळ्याचा नाही तर गंगेच्या पाण्याचा आहे असं राज ठाकरे म्हणाले. गंगेमध्ये अर्धवट जाळलेली प्रेतं टाकली जातात. गंगेचं पाणी हे पिण्यासाठी नाही तर अंघोळीसाठीही योग्य नाही असं राज ठाकरे म्हणाले. ज्यांना या गोष्टी कळत नाहीत त्यांनी मला हिंदुत्व शिकवू नयेत असंही राज ठाकरे यांनी ठणकावलं. पहिला विषय म्हणजे कुंभमेळा. कुंभमेळ्यातून पाणी आणलेलं पिणार नाही असं सांगितलं. नव्याने वारं शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं की मी कुंभमेळ्याचा अपमान केला. ज्या नदीला आपण माता म्हणतो, देवी म्हणतो त्यांची अवस्था ही भीषण आहे. गंगा साफ करावी असं पहिल्यांदा राजीव गांधी यांनी म्हटलं. त्यांनी ते कामही सुरू केलं. तेव्हापासून अजूनही गंगा साफ होतेय. मोदींनीही तेच सांगितलं.

आपल्याकडच्या देशातल्या नद्यांची अवस्था अशी आहे की पाणी पिण्याचं सोडाच पण अंघोळही करू शकत नाही. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर अनेकजण आजारी पडल्याचं एकाने सांगितलं. प्रश्न हा कुंभमेळ्याचा अपमान करण्याचं किंवा गंगेचा अपमान करण्याचं नाही. प्रश्न आहे तो पिण्याचा पाण्याचा. असं सांगत राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ शेअर केला. गंगेच्या शुद्धीकरणावर ३३हजार कोटी खर्च करण्यात आलं आहे. एका महंताला तसंच टाकून देण्यात आलं. अर्धवट प्रेत जाळले जातात आणि तसेच गंगेत टाकले जातात. जर धर्म अशा प्रकारे आडवा येत असेल तर काय करायचं याचं? काळ बदलला. आताच्या गोष्टी वेगळ्या आहेत. हेच सगळे विधी आटपण्यासाठी त्या घाटावर एक वेगळी जागा करता येत नाही का? कुंभमेळ्यामध्ये ६५ कोटी जनता येऊन गेले असं सांगण्यात आलं. म्हणजे अर्धा भारत आला का?

महाराष्ट्रातल्या नद्यांचीही हीच परिस्थिती आहे. सावित्री नदीची अवस्थाही तीच आहे. देशभरात ३११ नदीपट्टे हे प्रदूषित असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ५५ नद्यांचा समावेश आहे. ज्यांनी मनसेला मतदान करून ज्यांची मतं दिसली त्यांचे आभार मानतो. ज्या मतदारांनी मनसेला मतदान करूनही, इलेक्ट्रॉनिक मशिनमध्ये ज्यांची मतं दिसली नाही त्यांचंही आभार मानतो. निवडणुका कशा झाल्या यावर बोलून झालंय. आज अनेकांनी मला शुभेच्छा दिल्या, नेमकं आजच का दिल्या हे मला समजलं.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें