• Sun. Oct 19th, 2025

मला हे प्रकरण वाढवायचं नाही. हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे – जान्हवी



मला हे प्रकरण वाढवायचं नाही. हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे – जान्हवी

सिद्धांत शिरसाट प्रकरणात ४८ तासांत मोठा ट्विस्ट ;जान्हवी म्हणाली, ‘मी सर्व आरोप मागे घेते’

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहितेने गंभीर आरोप केले होते. सिद्धांत शिरसाट यांच्यावर महिलेने मानसिक आणि शारीरिक छळ, धमकी, हुंडा आणि फसवणुकीचे आरोप केले होते. सिद्धांत शिरसाट यांनी आपल्यासोबत विवाह करुन गर्भधारणा झाल्यावर गर्भपात करुन घेतल्याचा आरोप महिलेने केला. या महिलेचं नाव जान्हवी असं असल्याची माहिती आता समोर आली आहे. पण आरोपांनंतर अवघ्या ४८ तासांत संबंधित महिलेने आपल्या आरोपांपासून घुमजाव केला. आपण सर्व आरोप मागे घेत असल्याचं महिलेने म्हटलं. आरोप करणाऱ्या जान्हवीने सिद्धांत शिरसाट यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवली होती. पण आता आपलं घरगुती प्रकरण असल्याचं म्हणत जान्हवीने आरोप मागे घेतले आहेत. मला हे प्रकरण वाढवायचं नाही. हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे. किंवा माझ्या नावाने कुणी राजकारण केलं तर मी कायदेशीर कारवाई करणार”, असा इशारा जान्हवी यांनी दिला आहे. तसेच “संजय शिरसाट यांच्याविषयी माझी कुठलीही तक्रार नाही. त्यांनी मला कधीच फोन केला नाही”, असंही जान्हवी यांनी म्हटलं आहे.

मी जी काही नोटीस पाठवली आहे. मला हा विषय इथेच संपवायचा आहे. मला पुढे कुणावर कारवाई करायची नाहीय. मला हा विषय इथेच संपवायचा आहे. हा माझा वैयक्तिक पर्सनल मॅटर आहे. मी तो इथे क्लोज करते. मला पुढे वाढवायचं नाही. कारण हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे. पण लोक हे प्रकरण उचलून घेत आहेत. राजकारण होत आहे. मी कुणालाही या प्रकरणात मध्ये घेतलेले नाही. मी जी नोटीस पाठवली होती ती मागे घेत आहे. मला कुणावर आरोप करायचे नाहीत”, असं महिलेने म्हटलं आहे.

“मी संजय शिरसाट यांच्यासोबत आहे. त्यांनी मला आजपर्यंत त्रास दिलेला नाही. मला त्यांच्यापासून कोणताही दबाव नाही. त्यांच्या मुलाचा आणि माझा मॅटर होता. तो पर्सनल होता. हे आमचं घरगुती प्रकरण होतं. हे वेगळंच होतं. हा विषय मी इथे संपलेला आहे. पण लोकं वाढवत आहेत. मीडिया बातम्या करत आहेत. पण मी कुणलाही सांगितलं नाही. मी आज मीडियाला मुलाखत देत कळवत आहे की, मला हे प्रकरण वाढवायचं नाही”, असं महिलेने स्पष्ट केलं आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें