• Sun. Oct 19th, 2025

अभिनय सम्राट अशोक सराफ यांचा दिल्ली दरबारी खास सन्मान; राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार



अभिनय सम्राट अशोक सराफ यांचा दिल्ली दरबारी खास सन्मान; राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात भारतातील ६८ प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. २५जानेवारी रोजी ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या नागरी पुरस्कारांसाठी एकूण देशातील १३९ प्रतिष्ठित व्यक्तींची नावे जाहीर करण्यात आली होती. मनोरंजन विश्वातील काही दिग्गजांचादेखील या सोहळ्यात पद्म पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अवघ्या महाराष्ट्रासाठी सन्मानाची बाब म्हणजे २७ मे रोजी अभिनय सम्राट आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात झालेल्या या वर्षातील दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींनी ६८ दिग्गजांना पुरस्कार प्रदान केले.

 

दरम्यान पुरस्कार सोहळ्यातील खास क्षण शेअर करताना अशोक सराफ यांनी अशी पोस्ट शेअर केली की, ‘पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबीयांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार — तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमचा प्रेम आणि आशिर्वाद कायम असाच राहू द्या.’ हा सोहळ्यासाठी अशोक यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ, भाऊ सुभाष सराफ उपस्थित होते.

कला क्षेत्रातील ‘या’ दिग्गजांना जाहीर झालेले पद्म पुरस्कार

गायक पंकज उधास (मरणोत्तर)-पद्म भूषण,अभिनेते नंदमुरी बालकृष्ण- पद्मभूषण,अभिनेते अजित कुमार-पद्मभूषण,फिल्म निर्माता-दिग्दर्शक शेखर कपूर-पद्मभूषण,अभिनेता अनंत नाग- पद्माभूषण,अभिनेते अशोक लक्ष्मण सराफ- पद्मश्री,गायक अरिजीत सिंह- पद्मश्री,अभिनय प्रशिक्षक, थिएटर दिग्दर्शक बैरी गॉडफ्रे जॉन-पद्मश्री, गायिका जसपिंदर नरूला- पद्मश्री, गायक अश्विनी भिडे-देशपांडे- पद्मश्री,

संगीतकार रिकी ज्ञान केज-पद्मश्री, लोकगायक भेरू सिंह चौहान- पद्मश्री,भक्ति गायक हरजिंदर सिंह श्रीनगर वाले- पद्मश्री,लोक संगीतकार जोयनाचरण बाथरी- पद्मश्री,

शास्त्रीय गायिका के ओमानकुट्टी अम्मा- पद्मश्री,गायक महाबीर नायक – पद्मश्री,अभिनेत्री ममता शंकर -पद्मश्री आणि स्टंट दिग्दर्शक हसन रघू- पद्मश्री.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें