• Sun. Oct 19th, 2025

सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर



सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – गत विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याच्या कारवाईला जोर आला होता. आता, पावसाळी अधिवेशनात या दोघांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव मंजूर झाला आहे. कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या नया भारत या कॉमेडी शोमधून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टिका केली होती. कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्या दाढी, चष्म्यावरुन आणि शिवसेना पक्षातील बंडावरुन केलेले विडंबनात्मक गाणे गायले. कुणाल कामराचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले. तर, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. सुषमा अंधारेंनीही व्हिडिओ बनवला होता. त्यामुळे, या दोघांविरुद्ध हक्कभंग दाखल करण्यात आला होता, त्यास मंजुरी देण्यात आली आहे. कुणाल कामराने जिथं हे गाणं गायलं, त्या स्टुडिओची काही शिवसैनिकांनी तोडफोड केली. तसेच, कामराविरुद्ध मुंबईतील काही पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. तर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील कुणाल कामराचं गाणं म्हटल्याचा व्हिडिओ समोर आला. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या सभागृहात देखील उमटले. त्यानंतर कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात विधानपरिषदेचे सदस्य आमदार प्रविण दरेकर यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. आता सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्या विरोधातील हक्कभंग स्वीकारण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग मंजूर झाला आहे. त्यानुसार, आता कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंना सोमवारी नोटीस काढली जाणार असल्याने कॉमेडियन कामरा आणि शिवसेना नेत्या अंधारेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

कुणाल कामराने स्टँडअप कॉमेडी शोमध्ये एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या कवितेसंदर्भात हा हक्कभंग दाखल करण्यात आला होता. तर, कामराचा व्हीडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सुषमा अंधारेंनी शेअर करत, स्वत: व्हिडिओ बनवून समर्थन केल्याप्रकरणी त्यांच्यावर देखील हक्कभंग दाखल करण्यात आला होता. त्यास आता मंजुरी मिळाली आहे. सुषमा अंधारे यांनी बोलताना वापरलेली खालच्या पातळीवरील भाषा आणि कुणाल कामराने हेतूपूरस्पर उपमुख्यमंत्री यांच्यावर वैयक्तिक आणि उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एकप्रकारे सभागृहाचा अवमान करणारी आहे. त्यामुळे कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग मांडण्यास अनुमती द्यावी, अशी विनंती प्रवीण दरेकर यांनी केली होती. त्यावर सभापती राम शिंदे यांनी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडं योग्य त्या कारवाईसाठी पाठवित असल्याचे जाहीर केले होते.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें