• Sat. Oct 18th, 2025

पंतप्रधान मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व वैद्यकीय शिबिराचे आयोजन



पंतप्रधान मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व वैद्यकीय शिबिराचे आयोजन

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त “नमो नेत्र संजीवनी अभियान” अंतर्गत सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रात ८ ठिकाणी मोफत नेत्र तपासणी, वैद्यकीय तपासणी तसेच गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले.

हा पुढाकार भाजप आमदार तमिळ सेलवन आणि भाजप मुंबई उपाध्यक्ष रवी राजा यांच्या वतीने घेण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष व विधानपरिषद सदस्य श्री. प्रसाद लाड आणि आमदार तमिळ सेलवन यांच्या हस्ते अल्मेडा कंपाउंड बालवाडी, प्रतिशा नगर येथे करण्यात आले.

शिबिरे अल्मेडा कंपाउंड बालवाडी, जीटीबी मोनोरेल, वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल, सेक्टर ६ सिमेंट गार्डन यांसह एकूण ८ ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.

या उपक्रमाचा सुमारे ७,५०० नागरिकांनी नेत्र तपासणी, वैद्यकीय तपासणी व मोफत चष्म्यांचा लाभ घेतला. सदर कार्यक्रमाला सर्व मंडळ अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें