• Sun. Oct 19th, 2025

महिला डॉक्टरची परिचारिकेला घरात घुसून मारहाण; महिला डॉक्टरविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल



महिला डॉक्टरची परिचारिकेला घरात घुसून मारहाण; महिला डॉक्टरविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

पोलीस महानगर न्यूज नेटवर्क

श्रीगोंदा – शहरात अनेक ठिकाणी रागाच्या भरात घरात घुसून मारण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र बेलवंडी भागात मेसेज वरून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर मेसेज का करते, असं म्हणत महिला डॉक्टरने परिचारिकेला घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील महिला डॉ. माधुरी जगताप यांनी, “तू माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर मॅसेज का करतेस?”, अशी विचारणा करत, परिचालिकेला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. परिचारिकेच्या फिर्यादीवरून डॉ. माधुरी जगताप विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. माधुरी जगताप परिचारिकेच्या घरी जाऊन “तू माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर मॅसेज का करतेस?”, अशी विचारणा केली. त्यानंतर सोबत आणलेल्या लोखंडी गजानं परिचारिकेला मारहाण केली. एवढंच नाहीतर “माझ्याकडे त्यांचा नंबरही नाही, मी कशाला मॅसेज करू”, असं परिचारिकेनं महिला डॉक्टरला सांगितलं. मात्र, तरीही डॉ. माधुरी जगताप काही थांबल्या नाहीत. त्यांनी हातातील पाईपमध्ये लोखंडी गज टाकून परिचारिकेला मारहाण सुरूच ठेवली. याप्रकरणी परिचारिकेनं महिला डॉक्टरविरोधात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी फिर्यादीच्या आधारावर गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें