• Thu. Apr 2nd, 2026

बाप बेटे कोणीही उभे रहा, तुमची खुमखुमी उतरवतो; वडिलांना नडणाऱ्या गणेश नाईकांना खासदार श्रीकांत शिंदेंचं ओपन चॅलेंज



बाप बेटे कोणीही उभे रहा, तुमची खुमखुमी उतरवतो; वडिलांना नडणाऱ्या गणेश नाईकांना खासदार श्रीकांत शिंदेंचं ओपन चॅलेंज

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण डोंबिवली – सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांचे खच्चीकरण करू पाहणाऱ्या मंत्री गणेश नाईक यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी खुले आव्हान दिले आहे. खुमखुमी असेल तर ठाणे किंवा कल्याण लोकसभेत बाप बेटे कोणीही उभे रहा, तुमची खुमखुमी उतरवतो, असे जाहीरपणे श्रीकांत शिंदे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला गत काही महिन्यांपासून सुरू असलेल्या नाईक-शिंदे वादाची पार्श्वभूमी आहे.

गणेश नाईक हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आहेत. महापालिका निवडणुकांच्यावेळी ठाणे आणि नवी मुंबईत शिंदे यांचा वारू उधळू नये, यासाठी त्यांना कोंडित पकडण्याचे काम भाजप पक्षश्रेष्ठींनी नाईक यांच्याकडे सोपवले. त्यांनीही सातत्याने एकनाथ शिंदे यांना धारेवर धरून शा‍ब्दिक हल्ले सुरूच ठेवले. मात्र आता दोघांमधील शा‍ब्दिक फैरींची जागा खुल्या आव्हानाने घेतली आहे.

गणेश नाईक यांना एवढीच खुमखुमी असेल तर लोकसभेत बाप बेटे कोणीही उभे रहा, तुमची खुमखुमी उतरवतो. महायुतीतील मुख्य नेत्यांनाही विनंती आहे की यांची खुमखुमी उतरवायची आहे, उतरवू द्या. गणेश नाईक यांना स्मृतिभ्रंश झालाय. नाईकांना एकदा नाही दोन वेळा माजी केले आहे. त्यामुळे त्यांनी बोलताना विचार करावा, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

नवी मुंबईकरांच्या सुविधांसाठी रुग्णालये, उद्याने, सार्वजनिक वापरासाठी भूखंड देण्याची मागणी आपण सातत्याने करत आलो आहे. मात्र, मोकळे भूखंड नवी मुंबईकरांसाठी वापरात आणायचे सोडून बिल्डरांच्या घशात घालत आहेत. दलालांमार्फत हे काम केले जात असल्याचा गंभीर आरोप गणेश नाईक यांनी केला. यावेळी त्यांचा रोख एकनाथ शिंदे यांच्याकडे होता. माझ्या मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याने अशा प्रकारचे कृत्य केले याची लाज वाटते, अशी बोचरी टीकाही गणेश नाईक यांनी गत आठवड्यात शिंदे यांच्यावर केली होती.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें