• Sun. Oct 19th, 2025

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अभिनव गोयल यांची नियुक्ती



कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अभिनव गोयल यांची नियुक्ती

चंद्रप्रकाश मौर्या / ठाणे

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मावळत्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या जागी अखेर आठवड्याभराच्या कालावधीनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला नवे आयुक्त मिळाले आहेत. हिंगोली चे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने त्या संदर्भात एक पत्रक काढून या बदलीची माहिती दिली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त डॉक्टर इंदूराणी जाखड यांची १ एप्रिल रोजी पालघर जिल्हाधिकारी पदी बदली झाल्याने हे पद आठवडाभर रिक्त होते. अभिनव गोयल हे २०१५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून ते मूळचे मेरठ येथील आहेत. यांचे आई-वडील हे डॉक्टर असून आजोबा हे भौतिक शास्त्राचे तर आजी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका राहिल्या आहेत. आपल्या तिसऱ्या प्रयत्नात आयएएस परीक्षा ३६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले गोयल यांनी कानपूर आयआयटी मधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. २०१८ ला नांदेड येथे सहाय्यक जिल्हाधिकारी त्यानंतर लातूर जिल्हा परिषदेचे सीईओ मग धुळ्याचे जिल्हाधिकारी आणि सध्या ते हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदी कार्यरत होते.

हिंगोली जिल्ह्यात शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी तसेच शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांनी निपुण हिंगोली अभियान राबवले आहे. या अभियानात त्यांनी शाळांना भेटी देऊन गुणवत्तेची तपासणी केली. या अभियानात कामचुकारपणा करणाऱ्या दोन शिक्षकांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. या अभियानामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील शाळांमधून गुणवत्ता वाढल्याचे चित्र दिसू लागले आहे. या शिवाय महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नावर त्यांनी संजीवनी अभियान हाती घेतले. या अभियानात आशा कर्मचाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्याची माहिती संकलित करण्यात आली. यामध्ये सुमारे १३ हजार महिला कर्करोग संशयित असल्याचे दिसून आले असून आता तालुकास्तरावर त्यांची आरोग्य तपासणी सुरु करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये नेमके किती महिलांमध्ये कर्करोगाचे निदान होईल हे स्पष्ट होणार आहे. या शिवाय नुकत्याच झालेल्या गुंज येथील अपघातग्रस्त महिलांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी त्यांनी सर्व यंत्रणा कामाला लावली शिवाय स्वतः भेट देऊन पाहणी केली. पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण या विषयावर त्यांनी जिल्ह्यात यंत्रणांकडून चांगले काम करून घेतले. या ठिकाणी त्यांनी आपल्या चांगल्या कामाची छाप सोडली असून कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात ते कशापद्धतीने पुढे घेऊन जातात हे पाहणे रंजक ठरणार आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें