• Sun. Oct 19th, 2025

ठाणे डीपीडीसी बैठकीत एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; एसटीइएमचे एमडी संकेत घरत पदावरून हटवले



ठाणे डीपीडीसी बैठकीत एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; एसटीइएमचे एमडी संकेत घरत पदावरून हटवले

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीईएम या ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या सरकारी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत यांना पदावरून हटवण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यांच्या जागी तत्काळ पात्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेशही शिंदे यांनी दिले.

या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार बालाजी किणीकर, संजय केळकर, राजेश मोरे, किसन कथोरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, महापालिकेचे अधिकारी व पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनीही हजेरी लावली होती. मात्र, मंत्री गणेश नाईक व आमदार जितेंद्र आव्हाड या बैठकीस गैरहजर राहिले.

संकेत घरत यांची नियुक्ती अनधिकृत व नियमबाह्य असल्याचा आरोप काही लोकप्रतिनिधींनी केला. आमदार संजय केळकर यांनी एसटीईएम मधील भ्रष्टाचार व अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उपस्थित केला, तर रईस शेख यांनी भिवंडी महापालिकेला एसटीईएम कडून पाणीपुरवठा न मिळण्यामागे भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला.

या सर्व आरोपांची गंभीर दखल घेत शिंदे यांनी घरत यांची चौकशी करण्याचे आदेश देत त्यांचा चार्ज तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश दिले. तसेच, पात्र अधिकाऱ्याची वेळेवर नियुक्ती का झाली नाही याचाही तपास करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें