ठाण्यात अजित पवार गटाला झटका; माजी नगरसेवक प्रकाश बर्डे राष्ट्रवादीत परतले
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. माजी नगरसेवक प्रकाश बर्डे यांनी गुरुवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घरवापसी केली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
बर्डे यांनी शेकडो समर्थकांसह पक्षात परत येत आपला विश्वास सर्वसमावेशक नेतृत्वावर असल्याचे व्यक्त केले. याआधी ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटासोबत कळवा-मुंब्रा परिसरात राष्ट्रवादीत होते, परंतु अवघ्या वर्षभरात त्यांनी पक्ष सोडला.
दरम्यान, मुंब्रा-कळव्यातील पाणी तुटवड्यामुळे नागरिक संतप्त आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकार्यांना धारेवर धरत दसऱ्यापर्यंत मुदत दिली, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला.