• Sun. Oct 19th, 2025

महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी ! भाजप सोडून कुणाशीही युती करण्यास शरद पवार तयार; काका- पुतण्या एकत्र येण्याची शक्यता



महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी ! भाजप सोडून कुणाशीही युती करण्यास शरद पवार तयार; काका- पुतण्या एकत्र येण्याची शक्यता

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत महत्वाची बातमी आहे. राज्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता त्यासंबंधी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानंतर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांसाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मोठी बातमी येत आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्यास अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची युती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप वगळता कुणाशीही होऊ शकते, अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे. युतीसाठी अजित पवार यांच्या पक्षाचा ही पर्याय राहणार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी खुला असणार आहे. युतीबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीच्या नेत्यांवर सोपविले जाणार आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एकत्र येण्यास फारसे इच्छुक नसल्याची सूत्रांची माहिती आहे. अद्याप महाविकास आघाडीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत कोणतीच चर्चा नाही. सध्या महाराष्ट्रात राजकीय मनोमिलनाचे वारे जोरदार वाहू लागलेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची युती होणार या चर्चा सुरू असतानाच, दुरावलेले पवार काका-पुतणे देखील एकत्र येणार का याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे. मात्र प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधी लागण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या निवडणुका यंदा दिवाळीनंतरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें