• Sun. Oct 19th, 2025

शिवसेना वर्धापन दिनीच मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का; ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश



शिवसेना वर्धापन दिनीच मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का; ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होऊन गुरुवारी मुंबईतील ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याशिवाय ठाणे तसेच गोवा राज्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. ठाण्यात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात आमदार दिलीप लांडे, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते. या पक्ष प्रवेशाने शिवसेना वर्धापन दिनीच मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. ठाकरे गटाचे विभागप्रमुख आणि माजी नगरसेवक अजित भंडारी, शाखाप्रमुख संजय जंगम, माजी नगसेवक विजेंद्र शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेविका नादिया शेख आणि शिवसेना युवा सेना सचिव मोहसीन शेख यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच गोवा राज्यातील उबाठा गटाचे माजी राज्य प्रमुख उपेंद्र गावकर, काँग्रेस महासचिव काशिनाथ मयेकर, पाच तालुकाप्रमुख, एक शहर प्रमुख, विभागप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.

ठाण्यातील रामचंद्रनगर शाखेचे उबाठाचे उपविभागप्रमुख मोहन चव्हाण, विजय काते, विजय पवार, महादेव कदम, प्रवीण बामणे आणि अनेक उपशाखाप्रमुख, गटप्रमुख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत सामील झालेल्या लोकप्रतिनिधींच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. त्यांच्या प्रभागांतील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें