• Sun. Oct 19th, 2025

काँग्रेस नेत्यांची थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत बैठक; विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा



काँग्रेस नेत्यांची थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत बैठक; विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – राज्यात एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा-ओबीसीमध्ये वादंग उभं राहिले असताना ‘हैद्राबाद गॅझेटीयर’वरून सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर सध्या सुरु असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा- ओबीसीसह बंजारा समाजानेही बैठकीचं सत्र सुरु केल्याचे चित्र आहे. अशातच आता मातोश्रीवर देखील काँग्रेस नेत्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस दावा सांगणार असून सतेज पाटील यांच्या नावाची विधान परिषद विरोधी पक्ष नेते पदासाठी वर्णी लागण्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ २९ ऑगस्टला पूर्ण झाला. त्यानंतर विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस आग्रही आहे. सध्या विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसचे आठ आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत विधानसभा परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी कॉंग्रेसने दावा केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेते चर्चा झाल्याचीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढायच्या, विधान परिषदेच्या विरोधी पक्षपदासंदर्भात देखील चर्चा झाली. नक्कीच सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र अंतिम निर्णय दिल्लीतील हायकमांडच्या चर्चेनंतर अधिक माहिती दिली जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें