• Sun. Oct 19th, 2025

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला धोबीपछाड; कळवा-खारेगाव परिसरातील प्रभावशाली मिलिंद पाटील शिंदे गटात



पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला धोबीपछाड; कळवा-खारेगाव परिसरातील प्रभावशाली मिलिंद पाटील शिंदे गटात

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी आव्हाड यांनी होम ग्राउंडवर धोबीपछाड दिला आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील राजकारणाला मोठा झटका देणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते आणि कळवा-खारेगाव परिसरात प्रभावशाली मानले जाणारे मिलिंद पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. हे शिंदे गटासाठी मोठं बळ मानलं जात असतानाच, दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांसाठी हा एक राजकीय धक्का मानला जात आहे.

मुक्तागिरी येथे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मिलिंद पाटील यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाने आगामी महापालिका निवडणुकीत कळवा आणि खारेगाव सारख्या मतदारसंघांमध्ये शिंदे गटाची पकड अधिक मजबूत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिलिंद पाटील हे केवळ स्थानिक पातळीवर प्रभावी नेता असून ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेतेही होते. विशेष म्हणजे, मिलिंद पाटील हे जितेंद्र आव्हाडांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. विधानसभा निवडणुकीत आव्हाड यांना कळवा विभागातून मोठं मताधिक्य मिळवून देण्यात मिलिंद पाटील यांची निर्णायक भूमिका होती. त्यामुळे त्यांचा अचानक शिंदे गटात प्रवेश करणे, हे आव्हाडांसाठी राजकीयदृष्ट्या मोठं नुकसान ठरू शकतं.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें